अमित शाहंचे कोल्हापूरात श्री अंबाबाई दर्शन, निवडणुकीच्या जोडण्या
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय नेते आणि कोल्हापूरचे जावई असलेले अमित शाह लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आले. सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी त्यांची जाहीर सभा आयोजित केली होती. त्यासाठी गुरुवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. शुक्रवारी सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आज सकाळी एका खासगी हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष बैठक झाली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने, भाजपा राज्यसभा खा. धनंजय महाडिक, समरजित घाटगे नेत्यांकडून परिस्थिती जाणून घेतली त्यानंतर थेट बैठकीमधूनच शाह यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय बैठकीत चर्चा केली. दोन्ही जागांबाबत जिल्ह्यातील नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांना बैठकीतूनच शाह यांनी फोनवरुन सूचना केल्या. कार्यकर्त्यांना मतदान होई पर्यंत कामात राहा अशा सूचना केल्या.
