न्यू वाडदे वसाहतीतील महाडिक गटाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील न्यू वाडदे व्यंकटेश कॉलनीतल्या महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. आ. ऋतुराज पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केले.
आ. सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढे जोमाने काम करु, अशी ग्वाही या सर्व कार्यकर्त्यांनी दिली.
आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तानाजी पाटील, निलेश पाटील, रोहीत कुरणे, जीवन भालेराव, राजगुरु पाटील, आरीफ मकानदार, सचिन गंगापुरे, अशोक सावंत, मुस्तफा चॉंदवाले, आनंद शेट्टी, निखील पाटील, सुनील जाधव, गणेश जाधव, उमेश बागडी, अरविंद माने, रंगराव दळवी यांच्यासह व्यंकटेश नगर कॉलनीतील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रभारी सरपंच दत्तात्रय पाटील, माजी सरपंच सचिन कुर्ले, सुरेश माने शितल रेडेकर, सोसायटी चेअरमन सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
