विकसित भारत सत्यात आणणारा अर्थसंकल्प : खा. महाडिक
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सत्यात आणणारा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
खा. महाडिक यांनी पुढे म्हंटले आहे की अर्थसंकल्पातून देशातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी भरघोस निधीची तरतुद झालीय. महिला, शेतकरी, गरिब आणि तरूण वर्ग अशा सर्वच घटकांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पातून विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः २ कोटी लोकांना घरे, युवकांसाठी १ लाख कोटींचा व्याजमुक्त निधी, लखपती दिदी योजनेतून ३ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा संकल्प, नव्या रेल्वे डब्यांची निर्मिती, रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींची तरतुद, शेतकर्यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना, पीएम किसान योजनेतून शेतकर्यांना थेट मदत, पीक विमा योजना, दूध उत्पादक शेतकर्यांना मदत अशा अनेक विकासाच्या योजना या अंतरिम अर्थसंकल्पातून सत्यात येणार आहेत. सोलर पॅनल द्वारे १ कोटी कुटुंबांना महिन्याला ३०० युनिट वीज मोफत मिळेल. त्यामुळे विकसित भारताचं स्वप्न साकार करणारा हा परिपूर्ण अर्थसंकल्प आहे, असे म्हणता येईल.
