November 1, 2025

शिरोलीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; रेबीजची सोय करावी : शिवसेनेची मागणी

0
IMG_20250908_143202

शिरोली : भटक्या कुत्र्यांचा संपूर्ण शिरोली गावात नागरिकांनी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कुत्रे चावल्यानंतर रेबीजची लस उपलब्ध झाली नसल्याने एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. अशा प्रकारच्या परत घटना घडू नयेत म्हणून शिरोली गावातील सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, रेबीजची लस उपलब्ध ठेवावी अशी मागणी चे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,,(गट ) शिरोली शहर शिवसेना ,यांच्या वतीने मा. पं. स. समिती सदस्य, अनिल खवरे, मा. जि. प. सदस्य महेश चव्हाण, शहर प्रमुख राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोली ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,व ग्रामसेवक, यांना निवेदन देण्यात आले.
शिरोलीतील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात भटक्या कुत्र्यांची झुंड ठाण मांडून बसलेली असते. दुचाकी स्वारांना आणि पादचांऱ्यावर अचानक हे कुत्रे हल्ले करून चावा घेतात. यामध्ये जखमी झालेल्यांना रेबीजचे इंजेक्शन देणे गरजेचे असते पण शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीची लस उपलब्ध नसते त्यामुळे योग्य उपचार होऊ शकत नाही त्यामुळे प्राणाला मुकावे लागते.
दोनच दिवसापूर्वी शिरोली गावांमधील भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे गावातील सराफ व्यवसायिकास कुत्रे चावल्याने प्राण गमवावा लागला अशा प्रकारच्या परत घटना घडू नयेत म्हणून शिरोली गावातील सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधीकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. आशा मागणीचे निवेदन
शिरोली ग्रामपंचायत, सरपंच पद्मजा करपे, ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांना देण्यात आले. निवेदन उपसरपंच विजय जाधव यांनी स्वीकारले. यावेळी ,डे.सरपंच विजय जाधव ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सतिश पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य अनिल भाऊ खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेशभाऊ चव्हाण माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश कौदाडे, आघाडीचे नेते विजय पोवार ,माजी डे.सरपंच सुरेशराव यादव, उपशहर प्रमुख अशोक खोत, नितीन दळवी ,मुकुंद नाळे, सतीश रेडेकर ,हरी पुजारी ,सर्जेराव डांगे ,तानाजी चव्हाण, आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page