शिवसेना, डॉ. मिणचेकर फौंडेशन तर्फे नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
हुपरी : पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे व डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशन, हातकणंगले यांच्या वतीने व श्री टेके आय क्लिनिक, सांगली यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन गोकुळ दूध संघ, कोल्हापूरचे संचालक शिवसेना मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरामध्ये गावातील व परिसरातील सुमारे ७० हुन अधिक नागरिकांनी आपली मोफत नेत्र तपासणी करून घेतली तर त्यापैकी १६ नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी श्री टेके आय क्लिनिक, सांगली येथे नेण्यात आले आहे. यावेळी गोर-गरीब नागरिकांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात होते.
शिबिरास ग्रामपंचायत सदस्य अमर बनगे, शरद पुजारी, आनंदा पाटील, पट्टणकोडोली शिवसेना शहरप्रमुख आण्णा जाधव, किसन तीरपणकर, मारुती रांगोळे, गोगा बाणदार, पोपट कांबळे, लक्ष्मण पूजारी, राजू बोरगावे, संभाजी हांडे, रघुनाथ नलवडे बापू, राजु बोरगावे, राजू लंगु, पंकज रजपूत, गोटया पाटील तसेच शिवसैनिक व तपासणीसाठी आलेले नागरिक उपस्थित होते.
