महापालिकेतर्फे शहर सुशोभीकारण अंतर्गत वॉल पेंटिंग स्पर्धा
कोल्हापूर – रविवार दिनांक 21 रोजी डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका मार्फत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेने स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत शहर सुशोभीकरण करण्यासाठी वॉल पेंटिंग स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा निकाल 23 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
यामध्ये केएसबीपी चौक ते सायबर चौक या मार्गावर शिवाजी विद्यापीठाच्या भिंतीवर वॉल पेंटिंग काढण्यात येत आहे. या वॉल पेंटिंग स्पर्धेचे शुभारंभ प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, केशव जाधव, शहर अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सहायक आयुक्त विजय पाटील, कर निर्धारक संग्रहक सुधाकर चल्लावाड, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, सुरवसे व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी 15 कलाकारांच्या टीमने सहभाग घेतला असून त्यांच्या माध्यमातून वॉल पेंटिंग काढण्याची स्पर्धा सुरू करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा स्वच्छ भारत मिशन, पर्यावरण संवर्धन (माझी वसुंधरा अभियान), राष्ट्रीय हरीत हवा कार्यक्रम, प्लॅस्टिक बंदी जनजागृती, 3R- Reducing, Reusing & Recycling, क्रिडाविषयक जनजागृती व कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळे असे 7 विषयावंर हि स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 25 हजार व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकास 20 हजार व प्रशस्तीपत्र तृतीय क्रमांकास 15 हजार व प्रशस्तीपत्र, 3 उत्तेजनार्थांना रु.5 हजार व प्रमाणपत्र तसेच या स्पर्धेत भाग घेण्याऱ्या सर्व स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने भिंतीवर प्रायमर (पांढरा रंग) मारून दिलेला आहे स्पर्धेचे मुल्यांकन कला शिक्षकामार्फत व परिक्षण समितीमार्फत करण्यात येत आहे.
