November 2, 2025

महापालिकेकडून अनधिकृत मदरसा, प्रार्थना स्थळाला टाळे

0
hinduttv-768x429

कोल्हापूर: कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत टाळं ठोकलं. फक्त टाळे ठोकू नका अनधिकृत बांधकामच पाडून टाका अशी मागणी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनानी संयुक्तपणे महापालिका आयुक्त के.अंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. को    कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना करण्यात आला होता यामुळे लक्षतीर्थ वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

  विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महापालिकेच्या अतिक्रमणविभागाला लक्षतीर्थ वसाहत मध्ये अनधिकृत प्रार्थना स्थळ आणि मदरशा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आज महापालिकेचे अधिकारी पोलीस फौज फाट्यासह वसाहतीत दाखल झाले होते. लक्षतीर्थ वसाहतीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून प्रार्थना स्थळापर्यंत पोलिसांनी बॅरिकेट्स लावून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त त्यांना केला होता. अनधिकृत मदरशा परिसरात यामुळे पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंगळवारी महापालिकेत या संदर्भात बैठक झाली होती. मदरशा चालकांनी मदरसा आणि प्रार्थना स्थळ अनधिकृत असेल तर प्रार्थना स्थळ आणि मदरसा या अधिकृत होईपर्यंत ते बंद ठेवू अशी भूमिका मांडली होती. आज सकाळी अधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी पाहणी करायला करण्यासाठी गेले तेव्हा मदरशा आणि प्रार्थना स्थळ बंद अवस्थेत होते, यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जागेचा पंचनामा केला आणि अनधिकृत मदरसा व प्रार्थना स्थळ बंद केले.
कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत प्रार्थना स्थळे असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई त्वरित करावी. प्रार्थनास्थळावर अजूनही मोठ्या आवाजाची भोंगे लावण्यात आले आहेत तेही हटवावेत अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page