November 1, 2025

शिवसेना ठाकरे गटाची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0
20240327_165607

मुंबई :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  गटाची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात यादी जाहीर केली आहे.

राज्यभरातील १७ उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवरुन ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. याजागेवर काँग्रेसने महाविकास आघाडीतून जोरदार दावा करूनही शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही पक्षात मतभेद ताणले गेले आहेत. ईशान्य मुंबई युतीत भाजपकडे राहिलेल्या जागेवरही ठाकरेंनी उमेदवार दिला आहे. हातकणंगलेच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.
ठाकरे गटाचे जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे.
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे-पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर,छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, धाराशिव – ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे, नाशिक – राजाभाई वाजे, रायगड – अनंत गीते, सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत, ठाणे – राजन विचारे, मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत, मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर, परभणी – संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page