राहुल रेखावार यांची पुण्याला बदली, अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पुणे येथील महा स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (एम एस सी आर टी) च्या डायरेक्टर पदावर नियुक्ती झाली आहे. सध्या या पदावर कार्यरत असलेले अमोल येडगे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.
अमोल येडगे हे महा स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (एम एस आर टी) पुणे याचे डायरेक्टर होते. बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने १७ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. दरम्यान रेखावार यांची कोल्हापुरातील कारकिर्द प्रभावी ठरली होती. त्यांनी सरकारी योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी महोत्सव आयोजनात पुढाकार घेतला होता. त्यांनी नागरिकांना थेट भेटण्यासाठी राखून ठेवलेली वेळ. पर्यटन महोत्सव यासह महसूल खात्यातील निर्णय महत्वाचे ठरले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष पदाची कारकीर्दही लक्षणीय ठरली आहे. तर काही बाबतीत ते वादग्रस्तही ठरले. आणि मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता.
अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे.
