November 1, 2025

सुंदर सजावटीसह कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

0
IMG-20240219-WA0408

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्हावासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हे शिवराज्यभिषेकाचे 350 वे वर्ष असून जिल्हयातील सर्व कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्श या ठिकाणी लागले आहेत हे आपले भाग्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे. सकाळी पन्हाळगडावर 1200 च्या वरती युवकांनी मशाली आणल्या. प्रत्येक ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आजचा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. आपला भाग प्रगत असल्याचे कारण म्हणजे महाराजांनी घालून दिलेले संस्कार आणि त्यांचा अभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत शिलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन-पाटील, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, विवेक काळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार याच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page