December 27, 2025

कोल्हापुरातील ई-बसेसच्या पायाभूत सुविधांसाठी १८ कोटी मंजूर

0
20240214_232429

कोल्हापूर : कोल्हापुरात लवकरच शंभर इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसणार आहेत. पंतप्रधान ई-बस सेवा योजनेतून कोल्हापूरसाठी १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी खा. धनंजय महाडिक यांनी दिली होती. आता या बसेस लवकरात लवकर कोल्हापुरात सुरू व्हाव्यात, यासाठी खा. महाडिक पाठपुरावा करत आहेत. याबाबत दिल्लीमध्ये नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये ई-बसेस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी, सुमारे १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पंतप्रधान ई बस सेवा योजनेतून कोल्हापूरला तब्बल १०० इलेक्ट्रिकल बसेस मंजूर झाल्या आहेत. या ई बसेस मंजूर होण्यासाठी आणि लवकरात लवकर कोल्हापुरातील रस्त्यावर या बस धावाव्यात, यासाठी खा. धनंजय महाडिक यांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यातून कोल्हापूरच्या ई-बसेस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी, सुमारे १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून ई बसेस चालवण्यासाठी आवश्यक मूलभूत तांत्रिक सुविधांची पूर्तता केली जाणार आहे. केंद्र शासनाकडून मिळालेल्या १७ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीमधून विविध कामे होणार आहेत.

त्यामध्ये एमएसईडीसीएल यांच्या एचटी लाइनसाठी १० कोटी ३५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यातून गोकुळ शिरगाव ते शास्त्रीनगरमधील केएमटी वर्कशॉप या मार्गावर दहा किलोमीटर लांबीची भूमिगत ३३ किलोमिटरची विद्युत केबल लाईन येणार आहे. तसेच महावितरणच्या सबस्टेशन मधून स्वतंत्र फिडर कार्यान्वित होणार आहे. त्याचप्रमाणं महावितरण साठी सुरक्षा ठेव म्हणून ३ कोटी ५४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर के. एम. टी. च्या वर्कशॉपमध्ये, कमी दाबाची विद्युत वाहिनी तसंच ट्रान्सफार्मर आणि अन्य अंतर्गत कामासाठी ४ कोटी ६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

कोल्हापूर साठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेससाठी मूलभूत तांत्रिक कामांच्या पूर्ततेकरता एकूण १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याने, लवकरच कोल्हापुरात ई बसेस धावू लागतील, असा विश्वास खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page