लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा, १९ एप्रिल ते १ जून पर्यंत ७ टप्प्यात मतदान
कोल्हापूर : देशातील लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासुन सुरू झाली. आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज सात टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचे घोषणा केली. याबरोबरच देशात लोकसभेच्या निवडणुकीतची आचारसंहिता सुरु झाल्याचीही घोषणा करण्यात आली.
एकूण ५४३ जागेसाठी १९ एप्रिल ते १ जून पर्यंतच्या ७ टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी एकाच दिवशी होणार आहे. देशात जवळपास एकूण ९६कोटी ८८ लाख मतदार असून यामध्ये 49 कोटी पुरुष, तर 47 कोटी महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतचा ई. व्ही. एम. मशिन्सवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात ५ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर सोलापूर सह कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात आणि गोवा राज्यात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सांगलीसह ११ लोकसभा मतदारसंघांत पुढीलप्रमाणे मतदान प्रक्रियेच्या तारीख दिल्या गेल्या आहेत. नामनिर्देशन :-१२ एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेणे :- १९ एप्रिल, उमेदवारी अर्ज छाननी :-२० एप्रिल, उमेदवारी अर्ज माघारी घेणे :- २२ एप्रिल, मतदान :-७ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
