November 1, 2025

विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट ‘सूर लागू दे’ होतोय प्रदर्शीत

0
IMG-20231227-WA0227

मुंबई : दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा १२ जानेवारी २०२४ रोजी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. चित्रपटातील गाणीही सुरेख असून, रीना मधुकर प्रमुख भूमिकेत आहेत. एक अनमोल संदेश देणारा हा चित्रपटाबाबत दिग्दर्शक प्रवीण बिर्जे म्हणाले की, याचं कथानक कालातीत आहे. हे जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकणारं असल्याने कोणत्याही प्रेक्षकाला हे आपलंसं करणारं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.
‘सूर लागू दे’ हा चित्रपट समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. मानवाने ठरवलं तर कर्माच्या बळावर तो नराचा नारायण होऊ शकतो. एखादी चांगली गोष्ट करताना वय केवळ आकडा बनून राहातं. आयुष्याच्या संध्याकाळीही इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश ‘सूर लागू दे’द्वारे सर्वदूर पोहोचणार आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, रीना मधुकर, मेघना नायडू यांच्यासह आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, आदी कलाकारांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page