सोनी मराठीवर होणार रंगपंचमी महासंगम!
मुंबई : सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आता लवकरच होळी आणि रंगपंचमी येणार आहेत. सोनी मराठीवर रंगपंचमी महासंगम पहिल्यांदाच होणार आहे. महासंगम म्हणजेच सोनी मराठीवरील सगळ्यांच मालिकांतील प्रेक्षकांना आवडणार्या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. सोनी मराठीवर पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहे. नेहमी निरनिराळ्या मालिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्या, प्रेक्षकांना आवडणार्या ह्या व्यक्तिरेखा रंगपंचमीसाठी एकत्र येऊन किती मजा करताहेत, हे आपल्याला येत्या सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.
‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील सराफ परिवाराने सोनी मराठीवरील या सगळ्या व्यक्तिरेखांना आपल्या घरी होळी पार्टीनिमित्त एकत्र बोलावले आहे. यामिनी सराफ यांनी या सगळ्याचं आयोजन केलं असून राजवीर आणि मयूरी हे या सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणार आहेत. या पार्टीमध्ये ‘वीरू आणि प्राजक्ता’, ‘मीरा आणि मल्हार’, ‘बयो आणि डॉ. विशाल’, ‘यशोधन आणि असीम’ हे सगळे कलाकार एकत्र दिसणार आहेत. या रंगपंचमी पार्टीमधील प्रमुख बाब म्हणजे या कलाकारांचे पेहेराव. सगळ्या जोड्या वेगवेगळ्या रंगांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. रंगपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळे रंग दिसतात. तशाच निरनिराळ्या रंगांमध्ये हे कलाकार आपल्याला दिसतील. शिवाय या महासंगममध्ये या प्रत्येक कलाकाराचे विशेष असे नृत्य सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होळी विशेष आणि प्रेक्षकांना आवडणार्या निरनिराळ्या गाण्यांवर हे कलाकार थिरकताना दिसणार आहेत.
तर तुम्हीपण नक्की या ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतल्या सराफांच्या घरातल्या या होळी पार्टीला. रंगपंचमी महासंगम सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
