सन मराठीवर नवीन मालिका ‘तुझी माझी जमली जोडी’

कोल्हापूर : ‘सन मराठी’ वाहिनी मैत्री हा विषय घेऊन नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे.
‘मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते’ हे वाक्य पटवून देण्यासाठी ११ डिसेंबरपासून ‘तुझी माझी जमली जोडी’ ही नवीन मालिका ‘सन मराठी’ वर येत आहे.
दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारं त्यांचं प्रेम अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता ही मालिका सन मराठी वाहिनी वर पाहता येणार आहे.
