November 1, 2025

‘माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा’ मराठी चित्रपट येतोय ९ मे रोजी

0
IMG_20250305_131744

मुंबई : प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही—वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. “माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा”, लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे, हृदयाला हादरवून टाकणारा हा चित्रपट आहे. ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे, जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की, तुम्हाला स्तब्ध करून भारावून टाकेल. जीवनात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते, प्रेम हीच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे हा मन हेलावून टाकणारा प्रवास यामध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे, तर संगीत विश्वजित सी. टी. यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page