November 2, 2025

महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची हॅटट्रीक : सोनी मराठीवर २ डिसेंबरपासून नवे पर्व

0
IMG-20241128-WA0149

मुंबई :’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. तब्बल ६ वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचे आजवर ८००पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत.२ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची हॅटट्रीक हे नवे पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या पर्वाचे वैशिष्ट्य काय असणार आहे, याबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या. यांतून अनेक पात्रे लोकप्रिय झाली, पण ती पात्रे फक्त त्या-त्या मालिकेमध्ये पाहिली. या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधली पात्रे एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धमाल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ह्या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहता येईल. यातून नक्कीच मोठा हास्यकल्लोळ निर्माण होईल आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे म्हणाले, “यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये काही नवनवीन पात्रे पाहायला मिळतील.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लेखक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि आधीच्या विषयांमध्ये नवीन पात्रांचा आणि गोष्टींचा समावेश करून ते सादर करण्यात येणार आहेत.’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे विशेष प्रोमोज प्रेक्षकांना आवडताहेत. पहिल्याच काही भागांमधला आश्चर्यचकित करणारा पहिलाच भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून दिसलेला तिच्यातला मुळातला रांगडेपणा प्रेक्षकांना भावला होता. तोच अभिनय आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यवीरांसह रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी ठसकेबाज भाषा आता हास्यजत्राच्या मंचावर पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page