November 1, 2025

लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’ २५ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित

0
IMG-20250212-WA0165

मुंबई : महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला लव फिल्म्स निर्मित “देवमाणूस” २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल या
सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झालाय. यामध्ये लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा आहेत.
या टीझरमध्ये अभिनेता महेश मांजरेकर वारकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. लक्ष वेधून घेणारे दृश्य आणि वेगवान साउंडट्रॅकसह, “देवमाणूस” चित्रपटाची भव्यता समजून येते.
विशेष म्हणजे, देवमाणूसचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये विकी कौशलच्या छावा चित्रपटासह प्रदर्शित केला जाणार आहे,
याबाबत दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस हा माझ्यासाठी अतिशय रोमांचक प्रोजेक्ट आहे कारण त्याची विलक्षण बांधणी आणि त्यातील पात्रांची सखोलता या प्रतिभावान कलाकारांनी जिवंत केली आहे. हा चित्रपट बनवण्याचा संपूर्ण प्रवास खूपच मनोरंजक आहे. मी प्रेक्षकांनी हा सिनेमा अनुभवण्याची आतुरतेने वाट पाहतो आहे.”
लव फिल्म्स प्रस्तुत, “देवमाणूस” या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page