December 26, 2025

‘येरे येरे पैसा ३’ मधून ईशान खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

0
IMG_20250707_191104

पुणे : धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट येत्या १८ जुलैल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते अमेय खोपकर यांचा मुलगा ‘इशान’ याचे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत निर्माते, दिग्दर्शक, कालकाराच्या उपस्थितीत चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित केले.
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “ ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये सनी-बबलीच्या नात्याला एक इमोशनल तरीही फन टच द्यायचा प्रयत्न केला आहे. हे एक मजेशीर गाणे असले तरी या गाण्यात खूप काही घडत आहे. ज्याने कथा पुढे जातेय. आता ते काय आहे याचे उत्तर चित्रपटगृहातच मिळेल.”
चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त करताना दिसतेय. या गाण्याची पार्श्वभूमी जरी भावनिक असली तरी हे गाणे जबरदस्त संगीत आणि हटके स्टाईलमध्ये सादर करण्यात आले आहे. हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रेक्षकांना थिरकायला लावणारे आहे. गाण्याचे खास आकर्षण म्हणजे निर्माते अमेय खोपकर यांचे सुपुत्र ईशान अमेय खोपकरही या गाण्यात दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ईशानचे मराठी चित्रसृष्टीत पदार्पण झाले आहे. तर या गाण्यात चित्रपटातील इतर कलाकारांसोबतच सोनाली खरेचीही झलक दिसत आहे.
निर्माते अमेय खोपकर म्हणाले, “ हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण या गाण्यातून माझ्या मुलाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असून हा आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर, ईशान अमेय खोपकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page