November 2, 2025

तरुणांसाठी प्रेरणादायी कथानक असलेला ‘भुंडीस’ चित्रपट

0
IMG-20240508-WA0317

मुंबई : ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ हा मराठी चित्रपट
येत्या १७ मे पासुन संपूर्ण महाराष्ट्रत प्रदर्शीत होत आहे.
‘भुंडीस’हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी नव्हे तर या सिनेमातील अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत आहेत असे वाटत राहते , त्यात उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच प्रत्येकाला स्वत:चे वाटतील. चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेवून जातो. या कथेद्वारे सामान्यातून असमान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते. या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे.सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे. संगीत व सर्व गाणी उत्तम जमुन आली आहेत.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत शिंदे , रामभाऊ जगताप बाळासाहेब , यशराज डिंबळे, सुरेखा डिंबळे, माणिक काळे, कुमार पाटोळे , अश्विन तांबे , सुभाष मदने, आशुतोष वाडेकर तर याचबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर, नवनाथ काकडे
मेघराज राजेभोसले हे सुद्धा वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत
चित्रपटाचे निर्माते दत्ता बापुराव दळवी असून दिग्दर्शक वैभव राजेंद्र सुपेकर हे आहेत.चित्रपटाचे लेखन गीत संगीत सोमनाथ संभाजी तांबे यांनी केले असून गायक म्हणून आदर्श शिंदे, नंदेश उमप, राखी चौरे, निधी हेगडे हे लाभले आहेत. तर निर्मिती प्रमुख म्हणून प्रशांत बोगम हे काम पाहत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page