श्री संतकृपा कॉलेज ची कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भेट

श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीच्या एम. फार्म (फार्मास्युटिक्स व फार्माकॉलॉजी) शाखेच्या विद्यार्थ्यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रगत संशोधन यंत्रणांची माहिती मिळाली. यात विशेषतः ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (TEM), एक्स-रे डिफ्रॅक्शन (XRD) , गॅस क्रोमॅटोग्राफी–मास स्पेक्ट्रोस्कोपी (GCMS-MS), फुरिअर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी (FTIR) , पार्टिकल साईज अनालायझर विथ झेटा पोटेन्शियल (PSA-ZP) , इंडक्टिव्ह कपल्ड प्लाझ्मा–ऑप्टिकल एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी (ICP-OES), अल्ट्रा सेंट्रीफ्यूज यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक सुविधा प्रत्यक्ष पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचे संशोधन विषय अधिक सक्षम होण्यास मदत झाली असून, भविष्यातील संशोधन कार्यासाठीही ही भेट अत्यंत उपयुक्त ठरली.
या शैक्षणिक भेटीसाठी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याबद्दल आदरणीय सचिव श्री. प्रसून जोहारी सर व प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकर सर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन टी.पी.ओ डॉ. संदीप चव्हाण यांनी केले होते. तर समन्वयक म्हणून प्रा. मनोहर केंगार, प्रा. विद्या खेरडकर, प्रा. स्वरूपा शिरतोडे आणि प्रा. प्रियांका जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
