संतकृपा फार्मसी घोगाव ची ए.सी.जी. फार्मपॅक कंपनीला औद्योगिक भेट

दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी श्री संतकृपा फार्मसी महाविद्यालय, घोगाव येथील विद्यार्थ्यांनी शिरवळ येथील ए.सी.जी. फार्मपॅक कंपनीला औद्योगिक भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कंपनीतील एकूण पाच विभागांना भेट दिली – ए.सी.जी. कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग, वॅन्टेज न्यूट्रिशन, ए.सी.जी. फिल्म्स अँड फॉइल्स, ए.सी.जी. ए.पी.टी. आणि ए.सी.जी. पी.ए.एम. शिरवळ (साहित्य निर्मिती).
या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीतील कॅप्सूल उत्पादन प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्स, पॅकेजिंग तंत्रज्ञान तसेच उपकरण निर्मिती याविषयी प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव मिळाला. इतक्या मोठ्या व अत्याधुनिक कंपनीला दिलेली ही पहिलीच भेट असल्याने विद्यार्थ्यांचा हा अनुभव संस्मरणीय ठरला. कंपनीतर्फे विद्यार्थ्यांसाठी उत्तम नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना ए.सी.जी. लोगो असलेला कॉफी मग व छोटा ब्लूटूथ स्पीकर भेट म्हणून प्रदान करण्यात आला.
या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी ए.सी.जी. फार्मपॅक कंपनीकडून शशिकांत जोग, प्रेमा सालढाणा, केतन परमार, पूर्णिमा भोईर, प्राची गीते (एच.आर.) व वसुंधरा निवटे (एच.आर.) यांनी पूर्वतयारी, वेळापत्रक बनविणे आणि नियोजन या सर्व बाबींमध्ये मोलाचे सहकार्य केले. तसेच प्रसाद भागवत यांच्या मार्गदर्शनामुळे ही भेट शक्य झाली.
भेटीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सेक्रेटरी श्री. प्रसून जोहरी व प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाकडून प्रा. संदीप चव्हाण यांनी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केली, तसेच प्रा. संदीप चव्हाण व प्रा. स्नेहल कंक हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह या भेटीला उपस्थित राहिले.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच उद्योग क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान व अनुभव प्राप्त झाला.
