ट्विंकल स्टार स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
शिरोली : येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. या.राजू पाटील पत्रकार,संपत सकपाळ शिरोली हौसिंग सोसायटी चेअरमन,विजय पोवार ज्येष्ठ पत्रकार, सतीश रेडेकर शिवसेना,ग्राहकसेना प्रमुख, राजकुमार पाटील, शिवसेना शहरप्रमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बाटे होते.
यावेळी तिरंग्याचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले, ज्याने सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम कराटे, लाठी-काठी, देशभक्तीपर गीत, कवायत, भाषण सादर केले. ज्यामुळे सर्व परिसर देशभक्तीची जाणीव करून देणारा ठरला. यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल मनिषा बाटे यांनी अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे नियोजन व्हाइस प्रिन्सिपल प्रतिक्षा पाटील, पुनम बागी, सारिका काळे, कविता कश्यप, उमा सनदे, तास्निम मुजावर, दिशा लोहार, रुचिता रावल, विजया पोवार, संदिप पोवार सर. पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
