शिरोलीतील आय .एम. विनर स्पर्धा परीक्षेच्या केंद्रावर गोंधळ
शिरोली : शिरोली पुलाची येथे आय .एम. विनर या स्पर्धा परीक्षेचा पेपर ( प्रश्नपत्रिका ) एसटी महामंडळाकडून पार्सल वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यी व पालकांनी शिक्षकांना धारेवर धरले. पेपर येणार म्हणून विद्यार्थी व पालक दिवसभर केंद्राबाहेर ताटकळत उभे होते पण पेपर आलाच नाही. विभाग प्रमुख,, शाळा संचालक व पालक याच्या समन्वयातून हा पेपर २५ फेब्रुवारीला घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले .
शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील शिरोली हायस्कूल केंद्रामध्ये रविवारी सकाळी नऊ वाजता आय .एम. विनर हि स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांसाठी ध्येय प्रकाशनच्या वतीने
परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.. यामध्ये परिसरातील विविध शाळेतील ३८८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते . परीक्षेच्या वेळेत सर्व विद्यार्थी आप आपल्या नंबरवर जावून बसले पण एक तास झाला तरी पेपर मिळाला नसल्याने त्याना काहीच कळेना पेपर आजच आहे कि नाही हा प्रश्न त्याना पडल्यावर त्यानी वर्गातून बाहेर येत आपल्या पालकांना सर्व प्रकार सांगितला त्यानंतर पालकांनी पेपर बाबत केंद्रचालक याला विचारणा करत त्याना धारेवर धरत हा काय प्रकार आहे याचा जाब विचारला त्यावर केंद्रप्रमुख व शिक्षक यानी या परीक्षेचे पेपर एस टी महामंडळाच्या बसमधून पेपरचे पार्सल येणार आहे ते आल्यावर पेपर देण्यात येईल असे सांगितले व वेळ मारून पुढे नेले .
वेळ खुप झाला तरी अजून पेपर आलाच नाही म्हटल्यावर विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू झाली यावर शिक्षकांनी सांगितले की ज्या एस टी बस मधून येणारे पेपर आपल्या केंद्रावर आलेच नसल्याने आपणास ताटकळत रहावे लागले त्यामुळे शिक्षकानी दिलगीरी व्यक्त करत आजचा पेपर हा २५ फेब्रुवारी होईल असे सांगितल्यावर सर्व विद्यार्थ्यी व पालक घरी निघून गेले . या भोंगळ नियोजनामुळे विद्यार्थी व पालकांनी आक्षेप नोंदविला
