शिरोलीतील ट्विंकल स्टार स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
शिरोली : शिरोली येशील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित् आपल्या गुरुजनांचे, पालकांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात, आदरपूर्वक पुजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा बाटे यांच्या पाद्यपुजनाने सर्व शिक्षिकाच्या हस्ते पाद्यपूजन करून करण्यात आले. सर्व मुलाना आपल्या आई- वडिल आणि आजी-आजोबा याचे पाद्यपूजन करून तसेच फुले देऊन, मिठाई भरवून गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी स्कूलचे चेअरमन संतोष बाटे सर, प्रिन्सिपल मनिषा बाटे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील आणि सर्व शिक्षिकांनी केले.
