ट्विंकल स्टार स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
शिरोली : ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीअम स्कूल शिरोली (पु) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्ष्यात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात गुरू व्यासाच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली त्यानंतर स्कुलमधील सर्व शिक्षिकांनी स्कूलच्या प्रिन्सीपल सौ. मनिषा बाटे यांच्या पाद्यपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्कुलमधील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचे पाद्यपुजन केले. यावेळी चेअरमन संतोष बाटे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व पालकांचे पादयपुजन मुलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुलांनी पालकांचे पाद्य पुजन करुन,मिठाई भरवून, पालकांना फुले देऊन प्रथमगुरु आई – वडिलांना वंदन केले त्यानंतर विविध गुरु त्यांच्या आयुष्यात येतात शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारांमुळे माणूस घडतो. कार्यक्रमाचे नियोजन व्हाईस प्रिन्सिपल प्रतिक्षा पाटील, पुनम बागी, दिक्षा लोहार सारिका काळे तस्निम मुजावर कविता कश्यप, उमा सनदे संदिप पोवार, विजया पोवार, रुचिता रावल शिक्षक उपस्थित होते.
