कै.रा.म.महाडीक हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण
शिरोली – येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाची संचलित कै.रा.म.महाडीक हायस्कूल, नवजीवन विद्यानिकेतन आणि अंकुर विद्यालया मध्ये भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण मार्च २०२५ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आलेली विद्यार्थिनी तनुजा काशिलिंग गावडे हिच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ अशा या उपक्रमाची प्रेरणा भावी पिढीस निश्चित होईल अशी प्रतिक्रिया संस्थेचे संस्थापक प्रकाश तात्या कौंदाडे यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी कवायत प्रकार, लेझीम, झांज पथक,डंबेल्स, रिंग,लाठी,फॅन्सी ड्रील यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी समता या भिंती पत्रिकेचे उद्घाटन माता पालकांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणे व समूहगीते सादर केली स्वागत व सूत्रसंचालन शाहीन बागवान यांनी तर प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्राजक्ता ओऊळकर आणि पर्यवेक्षिका प्रियांका लाड यांनी केले शाळेच्या शिक्षिका जयश्री तिरपणे व भाग्यश्री ओक यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले विचार प्रकट केले शाळेचे प्रशासन प्रमुख एस.डी.लाड भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा केला.या प्रसंगी मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेत यश प्राप्त केलेल्या तनुजा गावडे,शिवानी राजभर, गोरक्ष येडवे, सुशील कानडे यांचा सत्कार करण्यात आला. सुशील कानडे यांने शाळेस पुस्तके भेट म्हणून दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक प्रकाश तात्या कौंदाडे, बाबासाहेब गुरव धीरज पाटील दिग्विजय कौंदाडे सागर कौंदाडे शंकर पाटील कवठेकर गुरुजी अनिता रावण लक्ष्मी गावडे सुजाता गावडे राधिका पाटील स्नेहल पाटील मनीषा गावडे पूजा कांबळे रोहन संकपाळ विजय पाटील व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार लक्ष्मी गावडे यांनी मानले.
