November 1, 2025

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या ‘अँथे 2025’ परीक्षा, शिष्यवृत्तीची घोषणा

0
IMG_20250813_131531

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;

कोल्हापूर- आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने ‘अँथे 2025’परीक्षा (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम)ची घोषणा केली आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतीक्षित वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे 2025 चा उद्देश इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खर्‍या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्हर्स होण्यासाठी सक्षम करणे हा आहे.ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे. तीन तासांची ही परीक्षा (सकाळी 10 ते दुपारी 1) ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल.अशी माहिती असिस्टंट डायरेक्टर अमिकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की अँथे 2025 द्वारे विद्यार्थ्यांना ₹२५० कोटींपर्यंतचे १००% स्कॉलरशिप्स आणि ₹२.५ कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे. ही संधी क्लासरूम, आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना NEET, JEE, राज्य CETs, NTSE आणि ऑलिंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन घेण्याचा मार्ग खुला होतो.
‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा 8वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस JEE Advanced तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ आणि एमडी  दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे.
या वर्षापासून आम्ही ‘इन्व्हिक्टस एस टेस्ट’ देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. हा कोर्स JEE Advanced च्या तयारीसाठी खास डिझाईन केला असून विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”
अँथे 2025 ची ऑनलाइन परीक्षा 4 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचं स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा 5 आणि 12 ऑक्टोबर 2025 रोजी भारतातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 415 पेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे.
अँथे 2025 साठी नोंदणी सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत असिस्टंट डायरेक्टर अमित कुमार शर्मा,ॲकॅडमीक हेड मेडिकल विंग चे अमजद अली, ॲकॅडमीक हेड इंजिनिअर विंगचे मनिष कुमार, ब्रॅंच मॅनेजर कोल्हापूर मोहन शिंदे, ब्रॅंच मॅनेजर सांगली कुमार चव्हाण माहिती देण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page