विनापरवाना घोडागाडी शर्यती : शिरोली सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांवर गुन्हे
शिरोली : शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील काशिलिंग बिरदेव यात्रा व पीर अहमदसो, पीर बालेचाँदसाब ऊरुस निमित्य आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये विनापरवानगी घोडागाडी शर्यत घेतल्याने सरपंच, उपसरपंचासह २३ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सर्व ग्रा. पं. सदस्य, महिला ग्रा. पं.सदस्यांचे पतींचा समावेश आहे.
शिरोली एमआयडीसी मधील शिवसूत्र तरुण मंडळ ते विटभट्टी माळभाग या परिसरात यात्रा व ऊरुसानिमित्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडी शर्यतीची परवानगी पोलिसानी दिली होती. पण बैलगाडी शर्यत संपल्यानंतर आयोजकांनी विनापरवानगी घोडागाडी शर्यती लावल्या. एमआयडीसी परिसरात डांबरी रस्त्यावर धावणाऱ्या चार घोड्यांचे पाय घसरले. यामध्ये चार घोड्यासह तीघेजण जखमी झाले. घोडागाडी रस्त्यावरून घसरुन पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. बैलगाडी, घोडगाडी शर्यती घेताना आवश्यक परवानगी आणि प्राण्यांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक आहे पण शिरोली ग्रामपंचायतीकडून नियमांचा भंग झाला. या प्रकारावर टिकेची झोड उठली. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कॉन्स्टेबल निलेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक सरपंच पद्मजा कृष्णात करपे, उपसरपंच अविनाश अनिल कोळी, बाजीराव शामराव पाटील, महादेव रघुनाथ सुतार, श्रीकांत बापू कांबळे, महंमद युसुफ महात, कोमल सचिन समुद्रे, हर्षदा दिपक यादव, अनिता विठ्ठल शिंदे, धनश्री योगेश खवरे, शाहरुख मौला जमादार, अरमान राजु सर्जेखान, सुजाता बाळासो पाटील, विजय बंडा जाधव, मनिषा संपत संकपाळ, कमल प्रकाश कौंदाडे, वसिफा हिदायततुल्ला पटेल, आरिफ महंमद सर्जेखान, नजिया मोहिद्दीन देसाई, शक्ती दिलीप यादव, फिरोज मौला जमादार, समीर नसीर सनदे, रियाज राजू नगारजी (सर्व रा. शिरोली पुलाची ता. हातकणंगले) यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
