November 1, 2025

नशिल्या इंजेक्शनची खरेदी-विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्या दोघांना अटक

0
GridArt_20250925_181004348

कोल्हापूर : वैदयकीय अधिकारी यांचे चिठठीशिवाय व सल्याशिवाय बेकायदेशिरपणे विना परवाना ‘मेफेंट्रमाईन सल्फेट’ (MEPHENTERMINE SULPHATE) नावाच्या नशिल्या इंजेक्शनच्या बॉटलची विक्री करणारा विवेक शिवाजी पाटील वय 30, रा. माळीवाडी, उचगांव, ता. करवीर, आणि विकत घेणारा औषध दुकानदार तेजस उदयकुमार महाजन वय 35, रा.प्लॉट नं. 109, शिवाजी पार्क, कोल्हापूर या दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द शाहुपुरी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, योगेशकुमार गुप्ता साो, यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैध अंमली पदार्थाचे बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण वर्ग नशेच्या आहारी जावुन गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत असलेने त्याचे समुळ उच्चाटन करणेकामी अवैध अंमली पदार्थ व बेकायदेशीर व बिगर परवाना नशिल्या इंजेक्शनचा साठा व विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली. पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री व नशिल्या इंजेक्शनची विक्री करणारे इसमाचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, शाहुपूरीतील निंबाळकर चौक ते रेडीयंट हॉटेल जाणारे रोडवर रॉयल नेस्ट अपार्टमेंटचे समोर एक इसम त्याचेकडील पांढरे रंगाचे अॅक्टीव्हा मोपेडवरुन MEPHENTERMINE SULPHATE इंजेक्शन हा अंमली पदार्थ विक्री करणेसाठी येणार आहे. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक. रविंद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सुचना व आदेश दिले.
त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दि. 25/09/2025 रोजी निंबाळकर चौक ते रेडीयंट हॉटेल जाणारे रोडवर सापळा रचला. त्यानंतर काही वेळातच एक इसम अॅक्टीव्हा मोपेड नंबर एम एच-09-डी सी-3277 यावरून तेथे येवून थांबला. काही वेळातच त्याचे जवळ दुसरा एक इसम आला व त्याने आपलेकडील बॉक्स त्या इसमाचे ताबेत दिला. त्याने तो बॉक्स गाडीच्या डिक्कीत ठेवताच त्यांचेवर छापा टाकून त्या दोघानांही पकडले. त्या इसमांची नावे तेजस उदयकुमार महाजन वय 35, रा.प्लॉट नं. 109, शिवाजी पार्क, कोल्हापूर व विवेक शिवाजी पाटील वय 30, रा. माळीवाडी, उचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे आहेत. इसम नामे तेजस महाजन याचे महाजन मेडिकल नावचे मेडिकल महादेव मंदिर, कदमवाडी या ठिकाणी आहे, त्यांचेकडे मिळून आलेल्या बॉक्समध्ये MEPHENTERMINE SULPHATE या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या 75 बाटल्या, गुन्हा करणेसाठी वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण 1,74,150/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेने तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने जप्त केलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेश कुमार गुप्ता साो, . अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदिप पाटील, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, गजानन गुरव, सुशील पाटील, सागर चौगले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page