शिरोलीतील घोडागाडी शर्यतीचे थरारक दृश्य, चार घोड्यासह दोघे जखमी
शिरोली : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे काशीलिंग बिरदेव यात्रा व पीर अहमदसो उरूस निमित्तानं घोडागाडी, बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास गावच्या माळवाडी परिसरात डबल घोडागाडी स्पर्धेची शर्यत सुरू झाली. शर्यती सोडण्यात आलेल्या डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर घोडागाडी मधील घोड्याचा पाय घसरल्याने अपघात झाला. या अपघातात त्या घोडागाडीच्या पाठोपाठ असलेली घोडागाडी ही रस्त्यावर कोसळली त्यामुळे ते घोडेही गंभीर जखमी झाले. तसेच या दोन्ही गाड्यांचे चालकासह एक दुचाकी स्वारही जखमी झाला.
शासनाने पुन्हा शर्यती सुरू करताना प्राण्यांच्या सुरक्षा बाबतीत नियम व अटी घालून दिल्या होत्या पण एका बाजूला नियम व अटींचं पालन करत असल्याचे सांगितले पण ज्या मैदानावर शर्यती भरवल्या त्या माळवाडी परिसरातील एका डांबरी रस्त्यावर या नियमबाह्य स्पर्धा घेतल्याचं दिसून आलें . या अपघाताची दृश्यं अनेक शौकिनांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपल्याने व्हायरल होताना दिसत आहे.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात मात्र कोणतीही नोंद नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
