पाचगाव रोड, हनुमान नगर परिसरात रिक्षा चालकाचा गळा चिरून खून
कोल्हापूर : पाचगाव रोड, हनुमान नगर परिसरात आज सकाळी रिक्षाचालक मोहन पोवार याचा त्यांच्या घरातच गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
रिक्षाचालक मोहन पोवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसल्याने शेजारच्या लोकानी आग विझवण्यासाठी धाव घेतली पण घरात मोहन पोवार यांचा जळत असलेला मृतदेह आढळून आला. तसेच त्यांचा गळाही धारदार शस्त्राने
चिरल्याचे दिसून आले. हा खूनाचा प्रकार असावा असा प्राथामिक असून
घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तसेच गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तातडीने तपास यंत्रणा कार्यरत केली. सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु असून, प्राथमिक चौकशीतून काही ठोस धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेपूर्वी मोहन पोवार यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर घरात कोणी आले होते का याचा तपास केला जात आहे.
त्यांचा मुलगा परत आल्यानंतर त्याने आपल्या वडीलांचा खून करून त्यानंतर घर पेटवले आणि शॉर्ट सर्कीट घर पेटल्याचा बनाव केला असण्याचा संशय व्यक्त केला.पाचगाव रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
