November 1, 2025

कर्तव्य बजावत असतानाच पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू

0
Screenshot_20231216_211654~2--800

 

कोल्हापूर : कर्तव्य बजावत असतानाच पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव जगन्नाथ भुजबळ ( वय ५४, रा. अंगपूर, जी. सातारा, सध्या रा. कोल्हापूर) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला .त्यानंतर त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचार दाखल केले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
उपनिरीक्षक भुजबळ शनिवारी कार्यालयात राज्यपाल रमेश बैस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्ताचे नियोजन करत होते. दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या छातीत दुखू लागले. ते जागेवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांना ताबडतोब खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्यांना दुसरा झटका आला. त्यानंतर त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
ते मुख्यालयातील वाचक विभागात नेमणूकीस होते.
ही घटना कळताच कोल्हापूरातच कार्यरत असलेले त्यांचे बंधू पोलीस निरीक्षक विकास भुजबळ हॉस्पिटलमध्ये आले. भुजबळ यांचे कुटुंबीयही हॉस्पिटलमध्ये आले.

आपल्या सहकाऱ्याचा असा ड्युटीवर असताना अचानक मृत्यू झाल्याने पोलीस दलात सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
त्यांच्या कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निलेश खोटमोडे पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीशकुमार गुरव, अविनाश कवठेकर यांनी सांत्वन केले भुजबळ यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, मुलगी, आई ,भाऊ असा परिवार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page