November 2, 2025

पत्रकारास मारहाण करणाऱ्या जमादारचा जिल्ह्यातून निषेध

0
IMG-20240510-WA0404

कोल्हापूर :  बातमी छापल्याचा राग मनात धरून पत्रकार प्रकाश तीराळे यांना मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर पत्रकारास मारहाण केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पहाटे दाखल झाला. पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादार याला अटक करावी या मागणीसह राजेखान जमादार यांच्या कृत्याच्या निषेधार्थ कोल्हापूर प्रेस क्लबसह जिल्यातील पत्रकार संघटनांनी निवेदन देऊन तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
याप्रकरणी पत्रकार प्रकाश तीराळे यांनी फिर्याद दिली आहे. राजेखान जमादार यांच्यावर या गुन्ह्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूर, इचलकरंजी मुरगुड यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार निदर्शने करण्यात आली.

शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी , अशी मागणी मुरगुड येथील पत्रकारांनी केली.  त्यांनी गणेश मंदिर चौकात मुरगूड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्यास अडवले. <span;>बातमी का छापली अशी विचारणा करत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे यास धरून ठेवले. जमादार यांनी श्रीमुखात भडकवली. यानंतर तिराळे यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल केला.
कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जमादार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार संघटनानी या कृत्याचा निषेध केला. गुंड प्रवृत्तीचे राजेखान जमादार यांच्यावर पत्रकार मारहाण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी केली. आंदोलनात शहर व परिसरातील पत्रकार सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page