गांधीनगरमध्ये चिमुरडीवर दोन मुलांनी केला अत्याचार : जिल्ह्यात संतापाची लाट
कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या गांधीनगरमध्ये अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. यामुळे गांधीनगर मध्ये वातावरण तणावपूर्ण बनले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गांधीनगर येथील एका सहा वर्षाच्या मुलीवर झोपडपटीत राहणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार समजल्यावर एकच खळबळ उडाली. याबाबत तक्रार देण्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईक दाखल झाले. पण पोलिसांनी प्रथम तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. ही घटना व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर मध्ये सर्वत्र पसरली. पाठोपाठ येथे व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने जमला. त्यांनी आरोपीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुरू ठेवली. यातून गोंधळ वाढत गेला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित तक्रार नोंदवून घेत हालचाली केल्या आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
दरम्यान, संबंधित मुलाच्या नातेवाईकांना जमावाने मारहाण केली. यावरून वाद वाढत गेला. संतप्त जमावाला काबूत आणण्यासाठी लाठीमार करावा लागला.
