गांजा सेवन, विक्री करणाऱ्यांची शिरोली परिसरात पोलीसानी काढली धिंड
शिरोली : शिरोली पुलाची, माळवाडी, तसेच नागाव परीसरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्या तिघांवर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटकेची कारवाई करून या तिघांची शिरोली परिसरातून धिंड काढली.
पोलीस अधिक्षक, कोल्हापुर महेंद्र पंडीत यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजासह नशिल्या पदार्थांची विक्री, सेवन करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलीस पथके तयार करून पोलीस ठाण्याच्य हददीत गस्त घालत असताना जियाऊददीन ताजुददीन मुल्ला रा. सनदे गल्ली शिरोली पुलाची, प्रेमकुमार जोखनलाल रा. संभाजी नगर नागाव, कुलदीप उजागिर राम रा. माळभाग नागाव ता. हातकणंगले हे गांजा सेवन करीत असताना मिळुन आले. त्यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करुन त्यांची शिरोली पुलाची, माळवाडी, नागाव परीसरात धिंड काढली. पोलीस ठाणेचे हददीत कोणीही अवैदयरित्या अंमली पदार्थाचा साठा अथवा विक्री करीत असल्यास त्याची माहिती पोलीसांना दयावी असे अवाहनही शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी केले आहे. सदरचा गांजा ते कोठुन आणतात यांचा अधिक तपास सुरु आहे. सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक प्रमोद चव्हाण, पोलीस उप निरीक्षक अमित पांडे, पोहेकॉ पवार, पोहेकॉ शेख, पो. हे. कॉ. संकपाळ, पो. कॉ. पाटील, यांनी केली.
