ट्रकमधील गॅसच्या टाकीला गळती; महामार्गावर घबराहट
शिरोली : राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बायोगॅस घेवून जाणाऱ्या ट्रकमधील गॅसला अचानक गळती सुरु झाली. यामुळे महामार्गावर आणि
परिसरात प्रचंड घबराहट पसरली.
गळती झालेला गॅस हवेत पसरून दुर्गंधी पसरली. तर गॅसचा स्फोट होईल या भितीने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गॅसच्या दुर्गंधीमुळे जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज काही काळ थांबविण्यात आले .
बत्तीस शिराळा येथून बायोगॅसच्या टाॅक्या भरून कागल येथील एका खासगी कंपनीत घेवून चाललेला ट्रक ( क्र. एम एच १० सी आर २९०६) हा शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आल्यावर ट्रकमधील काही बायोगॅस टाक्यांचा व्हाॅल निकामी झाल्याने मोठा आवाज होत गॅस हवेत मिसळू लागला होता हवेत मिसळुन त्याचा स्फोट होईल या भितीने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली . प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेले रूग्ण व डाॅक्टर यानी रुग्णालयातून बाहेर पडत पटांगणात धाव घेतली गॅस दुर्गंधीमुळे डाॅक्टरांचे कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले.कारण गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात परिसरात पसरली होती काही रूग्ण उपचारापूर्वीच घरी निघून गेले . घटनास्थळी गॅस गळती रोखण्यासाठी कंपनीचे व स्थानिकांनी नागरिकांनी धाव घेवून गॅस गळती रोखली . गॅस गळतीमुळे महामार्गवरील वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती .
