शिरोली एमआयडीसीत भिंत फोडून ६० लाखांची चोरी
शिरोली : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये नेक्सस कटींग सोल्युशन या टुल्स दुकानाची भिंत फोडून अज्ञात चोरट्यानी ६० लाखाचे कार्बाईड टुल्स चोरून नेले . हि घटना पोलिस ठाण्याच्या जवळच घडली. याबाबतची तक्रार दुकान मालक सागर पंडितराव निकम यानी शिरोली एम आय डी सी पोलिसात दिली आहे .
या बाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्मॅक भवनमधील गाळा क्र. १ मध्ये सागर निकम यांचे नेक्सस कटींग सोल्युशन नावाचे कटींग टुल्स व डिस्ट्रीब्युटरचे दुकान आहे. दुकानात चार कामगार आहेत. रविवार दि. २५ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान सुरू होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करुन निकम व कामगार आपआपले घरी निघुन गेले दि. २६ रोजी सोमवार असलेने दुकान बंदच होते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुकान उघडण्यासाठी कामगार अविनाश पाटील हा सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकान उघडले असता दुकानाची मागील भिंत फोडल्याचे दिसले .कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करत दुकानातील तिजोरी उचकटुन व टेबलचे ड्रॉवर उघडुन कार्बाईड धातुचे वेगवेगळे कटींग टुल्स (मिलींग इनसर्ट, ड्रील, मिलींग कटर, टर्निंग इनसर्ट, ग्रुव्हींग इनसर्ट, ड्रीलींग इनसर्ट, स्पेशल टुल्स, एन्डमिल्स) असे चोरुन नेल्याचे दिसले. अविनाश पाटील यांनी ही बाब
दुकानाचे मालक निकम यांना कळवली. यामध्ये 60,23,293 /- रुपये किमतीचे कार्बाईड इनसर्टस एकुण नग २७७१२ त्याची किंमत ४६,५४,५२७/- रुपये व सर्व प्रकारचे कटर्स एकुण नग ४३८ त्याची किमंत १०,००,८२१/- रुपये व सर्व प्रकारचे ड्रील्स एकुण नग १२३ त्याची किंमंत ३,६७,९४५/- रुपयांचा माल चोरीला गेल्याचे लक्षात आले. दुकान मालक निकम यांनी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला असून. स. पो. नि पंकज गिरी यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.
