‘ट्रायो इंटरप्राईजेस’ ला राज्य शासनाचा गोल्ड कॅटेगरीचा निर्यात पुरस्कार
कोल्हापूर :- पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय, उद्योग विभाग यांच्या वतीने शिरोली औदयोगिक वसाहतीतील ट्रायो इंटरप्राईजेस यांना गोल्ड कॅटेगरी इंजिनियरिंग विभागामध्ये सन २०२१-२०२२ या वर्षात महाराष्ट्रातील निर्यातीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आला ट्रायो इंटरप्राईजेसचे अजय सप्रे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी प्रधान सचिव उद्योग विभागाचे डॉ. हर्षदीप कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [ एमआयडीसी डॉ. विपिन शर्मा, विकास आयुक्त [उद्योग] आणि निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह आदी उपस्थित होते.यावेळी कंपनीचे सी.ई.ओ.अजय सप्रे, आदित्य सप्रे प्लांट हेड बी. बी. पाटील, निर्यात व्यवस्थापक स्वप्निल पाटील उपस्थित होते.
