‘स्मॅक’ मध्ये निमंत्रित व स्वीकृत सदस्यांची निवड
कोल्हापूर : शिरोली मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर म्हणजे स्मॅक मध्ये यापूर्वी कोणतेही पद भूषवले नसेल अश्या उद्योजक सभासदांना येणाऱ्या काळात ‘निमंत्रित सदस्य’ पदी नेमणूक करण्याची संकल्पना अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी स्मॅकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडली आणि ती त्वरित मंजूर झाली. आणि अशा 30 सभासदांची निमंत्रित आणि स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अनुभवाचा उपयोग शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर, स्मॅक व उद्योजकांना व्हावा या हेतूने स्मॅकच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या विचारानुसार ही नेमणूक २०२३-२४ सालाकरिता करण्यात आली आहे. दरवर्षी नवीन कारखानदारांना याप्रमाणे संधी दिली जाणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाच्या अनुषंगाने स्मॅकची स्थापना झाल्यापासून गेली ४० वर्षे जे उद्योजक कार्यरत आहेत या लोकांपासून ते सर्व सामान्य कारखानदारांना निमंत्रित सदस्य पदी पहिल्यांदाच निवड करण्यात आल्या.
यामध्ये जयसिंगराव पाटील, जयंतीलाल शहा, डी. व्ही. दुधाळ, पांडुरंग बुधले, पी. आर. घाटगे, प्रकाश चरणे, एस. के. होनकळसे, शांतिनाथ कित्तूर, अनिल दटमजगे, दीपक घोंगडी, सचिन मेनन, संजय भगत, पी. एस. आळवेकर, दिलीप कारेकर, अमोल कोंडेकर, अमित गांधी, किरण चव्हाण, आर. एल. साळुंखे, रवींद्र चौगुले, उत्तम पाटील, मतीन मंगोली, प्रकाश खोत, संजय आरवाडे, विनायक लाटकर, सुभाष अतिग्रे, कर सल्लागार विनायक गायकवाड व ॲड. अशोक उपाध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडीबद्दल जुन्या ज्येष्ठ कारखानदारांनी समाधान व्यक्त करताना हा निर्णय अनपेक्षित आणि आनंददायी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
स्वीकृत संचालक पदी शरद तोतला व राहुल कात्रूट यांची निवड करण्यात आली. या कामी व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, खजानिस बदाम पाटील,ऑ. सेक्रेटरी भरत जाधव व संचालकांचे सहकार्य लाभले.
