November 2, 2025

शिरोली उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त ; वीजपुरवठा तात्पुरता सुरळीत

0
parts-of-a-power-transformer

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या ११० केव्ही शिरोली अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला आहे. महापारेषण व महावितरणच्या समन्वयातून सद्यस्थितीत या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार तात्पुरत्या स्वरुपात याच उपकेंद्रातील दुसऱ्या ५० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवर आणि ११० केव्ही बापट कॅम्प अतिउच्चदाब उपकेंद्रावरून व्यवस्थापित करण्यात आला आहे. परिणामी विजपुरवठा सुरळीत आहे.

३३/११ केव्ही शिये, डी ब्लॉक, जी ब्लॉक, शुगरमिल व शिरोली मायनर या उपकेंद्राना ११० केव्ही शिरोली अतिउच्चदाब उपकेंद्रावरून वीजपुरवठा होतो. सदर उपकेंद्रातील नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यास एक आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे. या काळात वीज भाराचे सुयोग्य व्यवस्थापन करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापारेषण व महावितरण कंपनी प्रयत्नशील आहे. परंतु विजेचा भार वाढल्याने तांत्रिक कारणामुळे बिघाड उद्भभवून विजपुरवठा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वीजग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे महावितरण व महापारेषणचे आवाहन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page