December 27, 2025

मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार : औद्योगिक संघटनांचा निर्णय

0
IMG-20240418-WA0258

कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदार संघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने असलेल्या मतदारांना या दिवशी मतदान करता यावे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेऊन औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक या बैठकीमध्ये स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीमध्ये उत्स्फूर्तपणे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन उद्योजकांच्या पुढाकाराने स्टाफ व कामगारांनी ही मतदानामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे यासाठी एक पाऊल पुढे टाकून मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी औद्योगिक कारखाने, आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आणि याला सगळ्यांनी पाठिंबा दिला.
मतदाना दिवशीजाहीर केलेल्या सुट्टीच्या बदल्यात सर्व औद्योगिक संघटनांनी आदल्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक ६ मे २०२४ या साप्ताहिक सुट्टी दिवशी कामकाज सुरू ठेवून मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी सुट्टी देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
यावेळी स्मॅकचे उपाध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page