गोशिमाची निवडणूक बिनविरोध : आठ नवीन उद्योजकांना संधी
कोल्हापूर : जिल्हयातील नावाजलेल्या गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन [ गोशिमा ] ची सन २०२४ ते २०२९ करीता कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई , माजी अध्यक्ष सचिन शिरगांवकर, राजीव परीख व दिपक चोरगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. गोशिमाचे विद्यमान अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई यांनी गोशिमा निवडणूकी मधील बिनविरोधाची परंपरा कायम रहाणेसाठी या निवडणुकीतून आपला स्वतःची उमेदवारी मागे घेतली तसेच नव्या आठ तरुण उद्योजकांना संधी दिली. निवडणूक अधिकारी ॲड. इंद्रजित चव्हाण, संजय शेटे व राजू पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पाडली. आणि नूतन संचालकांच्या नावांची पत्रकार परिषदेत घोषणा केली.
गोशिमा संस्थेच्या सध्या असलेल्या कार्यकारी संचालक मंडळातील सात संचालक कमी होउन त्या जागी नवीन उमद्या आठ तरूण संचालकांची निवड कार्यकारी मंडळात करण्यात आली आहे. तरूण उद्योजकांना वाव देऊन संस्थेच्या नविन कार्यकारी मंडळात जेष्ठ संचालक व नूतन आठ संचालक यांचा योग्य समन्वय साधून गोशिमाचा पुढील कार्यकाळ यशस्विरीत्या व्हावा याची दक्षता घेण्यात आली. सन २०२४ ते २०२९ सालाकरीता बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारीणी सदस्य संचालकांची नावे खालील प्रमाणे आहेत.
दिपक चोरगे , स्वरूप कदम , सुनील शेळके , संजय देशिंगे, रणजीत पाटील, मंगेश पाटील, अमोल दिलीप यादव, नचिकेत कुंभोजकर, राजवर्धन जगदाळे, बंडोपंत यादव, सत्यजित चंद्रकांत जाधव, अनिरुद्ध तगारे, रणजीत मोरे, रामचंद्र दुंडाप्पा लोहार, व्ही.आर.जगताप.
पत्रकार परिषदेला सर्व नूतन संचालक उपस्थित होते.
