माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू यांचा स्मॅकच्यावतीने सत्कार : सुरेंद्र जैन
कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी आणि व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू यानी कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण, कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग याबाबत आवश्यक निर्णय घेऊन महत्वपूर्ण योगदान दिले. म्हणून शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) च्यावतीने त्याना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सुरेंद्र जैन म्हणाले शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)ची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या हॉटेल पॅव्हेलियन येथे संपन्न होत आहे.
यानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, रेल्वे, नागरी विमान वाहतूक मंत्री यांना निमंत्रित केले आहे.
दहा वर्षांपूर्वीही १६ ऑक्टोंबर २०१४ साली हॉटेल पॅव्हेलियन मध्ये स्मॅकच्या सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली होती, त त्यावेळी सुरेश प्रभू यानां निमंत्रित केले होते. त्याच ठिकाणी आज १६ ऑक्टोंबर २०२४ मध्ये पुन्हा प्रमुख प्रमुख म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
त्यांच्या उपस्थितीतील त्या सभेमध्ये कोल्हापूरच्या भविष्यकाळातील विकासाला दूरगामी परिणाम करणारे कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्ग, मुंबई-बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडोर, कोल्हापूर विमानतळ विकास हे तीन मुद्दे उपस्थित केले गेले. सुदैवाने त्यानंतर ते आठ दिवसांने भारताचे रेल्वेमंत्री झाले आणि व त्यांनी रेल्वेमंत्री पद ग्रहण केल्यानंतर कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग व नागरी वाहतूक मंत्री झाल्यानंतर कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतले.
कोल्हापूरच्या विकासासाठी केलेल्या कामांबद्दल सुरेश प्रभू यांचा सर्व औद्योगिक व अन्य संस्थांच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू’ ‘विकास व्हाया उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, शेतीपूरक उद्योग व समाज सहकार्य ‘ या विषयावर ते मार्गदर्शनही करणार आहेत.
यावेळी खजाणीस बदाम पाटील , ऑ. सेक्रेटरी भरत जाधव, संचालक राजू पाटील, सुरेश चौगुले, आदी उपस्थित होते.
