November 1, 2025

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी ठोस धोरण आवश्यक : अभ्यासकांचे मत

0
IMG-20240128-WA0223

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनासाठी सर्व काही आहे. परंतू ठोस धोरण मात्र नाही. त्यामुळे ‘चालेल तसे चालेल’ अशा पध्दतीने जिल्ह्याचा पर्यटन विकास सुरू आहे असे परखड मत व्यक्त करण्यात आले. भारतीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने गुरूवारी आयोजित चर्चासत्रामध्ये या क्षेत्रातील अभ्यासकांनी आपले विचार मांडले.
पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन सल्लागार वसिम सरकावस आणि हॉटेल व्यावसायिक सचिन शानबाग यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक, पत्रकार समीर देशपांडे यांनी एकूणच जिल्ह्यातील पर्यटनासाठीची पोषक परिस्थिती, लोकप्रतिनिधींची सोयीची धोरणे, कोल्हापूरात भव्य काही उभारण्याऐवजी होणाऱ्या मोठमोठ्या घोषणा यांचा प्रारंभी आढावा घेतला. वसिम सरकावस म्हणाले, पर्यटन व्यवसाय आणि त्यातील वाढ ही केवळ कोणा एकाची जबाबदारी नसून ती समाजातील सर्व घटकांची जबाबदारी आहे.दोन तृतीय पंथीयांना कारवॉ हॉलिडे ज् पर्यटन उद्योग प्रशिक्षण सुरु… भारतातील पहिलाच उपक्रम आहे. सचिन शानबाग म्हणाले, कोल्हापूर जिल्हा दर्शनासाठी एक दिवसीय सहल आयोजित केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकेल. डॉ. किमया शहा म्हणाल्या भवानी मंडप येेथे कायमस्वरूपी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची गरज आहे.

सिध्दगिरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर म्हणाले, कोल्हापूरभोवती राष्ट्रीय महामार्गांचे जाळे झाल्यामुळे आता कोल्हापूरचे मार्केटिंग बाहेर करण्याची गरज आहे. ‘सायबर’चे डॉ. दीपक भोसले म्हणाले, पर्यटनांच्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून तृतियपंथियाची नेमणूक ही क्रांतीकारी वाटते. किर्लोस्करचे शरद आजगेकर म्हणाले, स्वच्छतागृहांची व्यवस्था तृतियपंथीयांच्या संस्थेकडे द्यावी. यावेळी मयुरी आळवेकर म्हणाल्या, पर्यटन वाढीसाठी आवश्यक त्या ठिकाणी तृतियपंथियांचा सहभाग घेतल्यास ते आम्हांला अभिमानाचे असेल तसेच त्यातून आम्हांला रोजगारही मिळेल. यावेळी पर्यटन माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर सर्वांनी जिल्हाधिकार राहूल रेखावार यांची भेट घेतली. यावेळी सुहासिनी आळवेकर, शुभम खांडेकर, शिवानी गजबर, मंगेश बावचे, प्रथमेश जाधव उपस्थित होते.
पर्यटन समिती स्थापन करावी
शासकीय पातळीवर पर्यटन समिती स्थापन करण्यात येते. परंतू याच कामासाठी पूरक म्हणून हॉटेल व्यावसायिक, वाहतूकदार, गाईड, पर्यटन अभ्यासक, दुर्गभ्रंमतीकार अशा सर्वांची मिळून एक कोल्हापूर जिल्हा पर्यटन समिती स्थापन करावी असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page