महामार्गावर शिये फाटा येथे ट्रकच्या धडकेने मोटरसायकल स्वार ठार
कोल्हापूर : पुणे बंगळुरु महामार्गावर शिये फाटा येथे मोटरसायकलला ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. या अपघाताच्या अधिक माहिती अशी की सतिश पांडुरंग तावडे वय 47 रा.कोडोली ता. पन्हाळा येथील हे शिरोली एमआयडीसीतील मंत्री मेटँलीक्स या कारखान्यात नोकरीला होते. ते आज सकाळी कामावर जाण्यासाठी आपल्या मोटरसायकल (क्रमांक एम एच09बीजी9702) वरुन कोडोली येथून शिरोली एमआयडीसी कडे येत असताना शिये फाट्याजवळ धनराज हॉटेल समोर आले असता त्यांना पुण्याहून बेंगलोर कडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक एम एच 09जीजी1188)ने पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेने ते रस्त्यावर पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले आणि ते जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालक असीफ इब्राहिम सुतार रा. साजणी ता. हातकणंगले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास स. फौजदार मेतके हे करीत आहेत.
