November 1, 2025

ओमी वैद्य घेऊन येतोय ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपट

0
IMG-20231204-WA0109
कोल्हापूर : थ्री इडीयट्स या  चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यची प्रमुख भूमिका असलेला ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे ‘टीएटीजी फिल्म्स एलएलपी ची प्रस्तुती असलेला, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात येतो आणि त्याचा कसा अनपेक्षित वळणांचा प्रवास होतो हे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा , धेडगुजरी बोलणाऱ्या समरचा कसा कायापालट कायापालट होतो. त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत  ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page