हूपरीत निवडणूक चिन्ह वाटपावरून नगर परिषद परिसरात गोंधळ
कोल्हापूर : हुपरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी केलेल्या चिन्ह वाटपात एका स्थानिक आघाडीला दिलेले शिट्टी हे चिन्ह विरोधी आघाडीने आक्षेप घेतल्याने मागे घेतले. यामुळे चिन्ह मिळालेल्या आघाडीच्या नेत्यानी, उमेदवारांनी समर्थकांसह हुपरी नगरपरिषदेत धाव घेत निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी यानां जाब विचारत गोंधळ घातला. विशेष म्हणजे अधिकारी खिलारे यांनी आपली चूक कबूल केली.
आज सकाळी 11 वाजता हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप करण्यासाठी सर्व पक्ष आघाडी व अपक्षांना चिन्ह वाटप करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी युवक क्रांती व शिवशाही आघाडी या दोन्ही आघाड्यांना शिट्टी चिन्ह देण्यात आले. तसेच त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही शिट्टी चिन्ह देण्यात आले. यावर उपस्थित असलेल्या कोणत्याही पक्षाने वाघाडीने अपक्षाने आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे हे चिन्ह मिळालेल्या आघाडीतील उमेदवारांनी चिन्हाची चित्रे, कटाउट तयार करून चिन्हाचा प्रचारही हुपरी शहरात सुरु केला. रितसर चिन्ह वाटप झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी शिट्टी चिन्ह देण्यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी सायंकाळी पाच वाजता सर्व पक्षाच्या उमेदवार आणि प्रतिनिधींना बोलावून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटप बदल करण्यात येणार असल्याचे सांगीतले. याला युवक क्रांती व शिव शाहू आघाडीतील उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार हरकत घेतली. नगरपरिषदेसमोर या आघाडीचे समर्थकही जमले. त्यामुळे परिसरात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली. असून अजूनही या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी मुख्याधिकारी अजय नरळे तसेच पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्यासह शिव शाहू आघाडीचे व युवक क्रांती आघाडीचे पदाधिकारी यांच्यात मुख्याधिकारी कक्षात बराच वेळ चर्चा झाली. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी यांनी आपल्या अधिकारात या आघाडीला छत्री हे चिन्ह दिल्याचे जाहीर करून तसे पत्र दिले.
