श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचा पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय e-FDP यशस्वीपणे संपन्न

श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या घोगाव येथील श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आयोजित “ड्रग डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट” या विषयावरील पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम (e-FDP) ११ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री. प्रसून अशोक जोहरी यांच्या प्रेरणादायी संदेशाने झाले.
या कार्यक्रमातून आधुनिक औषध संशोधन, नवीन तंत्रज्ञान, औद्योगिक गरजा आणि शैक्षणिक दृष्टिकोन याबद्दल सोपी आणि उपयुक्त माहिती मिळाली. देश-विदेशातील मान्यवर तज्ज्ञांनी AI in Drug Discovery, Early Drug Development, US Drug Regulations, Preclinical Safety, PROTAC Drug Design, Protein Antibiotics अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. रामलिंग जी. पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. सहसंयोजक श्री. प्रसाद भागवत (Director, SKIPS) आणि डॉ. संदीप डी. चव्हाण (TPO) यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. तर IQAC Coordinator म्हणून श्री. मुकुंद ऊराडे यांनी योगदान दिले.
समन्वयक म्हणून डॉ. जमीर स. मुल्ला, प्रा. सौ. गायत्री जगताप, प्रा. दीपक भिंगरदेवे, प्रा. मनोहर केंगार, प्रा. स्नेहल कंक, प्रियांका थोरात, पल्लवी ताटे, प्रसाद सुतार यांनी सर्व सत्रांचे नियोजन, समन्वय आणि तांत्रिक व्यवस्थापन उत्कृष्टरीत्या केले.
देशभरातील ३०० हुन अधिक शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व सत्रांना उपस्थित राहून अभिप्राय फॉर्म पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमातून औषध शोध प्रक्रिया, आधुनिक संशोधन तंत्रज्ञान आणि प्रीक्लिनिकल सेफ्टी याबद्दलची समज अधिक वाढली, अशी प्रतिक्रिया सहभागी शिक्षकांकडून मिळाली.
तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा अशोक जोहरी यांनी अभिनंदनपर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील e-FDP कार्यक्रम केवळ शिक्षक आणि संशोधकांचा दृष्टीकोन विस्तृत करत नाहीत, तर संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसही मोठ्या प्रमाणात हातभार लावतात असा त्यांचा विश्वास व्यक्त केला. ज्ञानवृद्धी, तांत्रिक कौशल्ये आणि जागतिक शिक्षणमान यांचा संगम घडवून आणण्यासाठी श्री संतकृपा शिक्षण संस्था नेहमीच पुढाकार घेत आहे. भविष्यातही अशा दर्जेदार आणि उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षक, विद्यार्थी व संशोधकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ संदीप चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व समिती सदस्य, तांत्रिक टीम आणि सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
– श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव
#SSCOP #SantkrupaCollegeOfPharmacy #InternationalFDP #eFDP2025 #DrugDiscovery #DrugDevelopment #PharmacyEducation #PharmaResearch #AIinDrugDiscovery #USDrugRegulations #PreclinicalSafety #PROTAC #ProteinAntibiotics #AcademicExcellence #ResearchInnovation #IQAC #SkillDevelopment #PharmacyProfession #PharmaAcademia #GlobalLearning #PharmaTechnology #FacultyDevelopmentProgram
