December 26, 2025

रोमँटिक थ्रिलर ‘कैरी’ मराठी चित्रपट होणार १२ डिसेंबरला प्रदर्शित

0
IMG_20251118_121128

कोल्हापूर-‘कैरी’ हा मराठमोळा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला संबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी या सिनेमातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
‘कैरी’ या चित्रपटात सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे दिसतंय. दिग्दर्शक शंतनू रोडे आहेत. ‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. या स्टुडिओने बऱ्याच भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन मराठी चित्रपटानंतर ‘कैरी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे.  तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. तसेच,  चित्रपटाला संगीत दिलंय ‘निषाद गोलांबरे’ आणि ‘पंकज पडघन’ यांनी; तर पार्श्वसंगीत ‘साई पियूष’ यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page